लंडन,
Keir Starmer's resignation ब्रिटनच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राजीनाम्याची घोषणा करताना कीर स्टारमर यांनी देशहिताला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले प्रत्येक पाऊल देशाच्या हितासाठीच असल्याचे सांगितले. नव्या नेतृत्वाची निवड होईपर्यंत ते कार्यवाहक पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून लेबर पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा होती. विविध धोरणात्मक निर्णय, बदलते राजकीय समीकरण आणि घटती लोकप्रियता यामुळे नेतृत्वावर दबाव वाढत गेला. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्वबदलाची गरज व्यक्त केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले होते.राजीनाम्यानंतर आता ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू झाली आहे. सध्या अँडी बर्नहॅम यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कामगिरीमुळे पक्षातील अनेक नेत्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर वेस स्ट्रीटिंग यांच्याही नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे ब्रिटनमधील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आगामी काळात लेबर पक्ष कोणावर विश्वास दाखवतो आणि ब्रिटनचे पुढील नेतृत्व कोण स्वीकारते, याकडे केवळ ब्रिटनच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.