गडचिरोली,
international-yoga-day : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या सहकार्याने आपल्या विविध कार्यस्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. या उपक्रमाद्वारे कर्मचार्यांचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेची पुनर्प्रतिष्ठा करण्यात आली. कंपनीच्या विविध युनिट्समध्ये आयोजित योग सत्रांमध्ये कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामुळे संस्थेचा सर्वांगीण आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर असलेला भर अधोरेखित झाला.
यामध्ये हेदरी युनिट्समधून 700 कर्मचार्यांनी सहभाग घेतला कोनसरी युनिट्समधून 500, टीएलएस युनिटमधून 250 सहभागी, तर एलएमजीएसई गडचिरोली 370 कर्मचारी असे एकूण 1820 कर्मचार्यांनी सहभाग नांदविला अनुभवी योग प्रशिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि विश्रांती तंत्रांचे मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्याने शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्पष्टता, भावनिक संतुलन आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते, यावर सत्रांमध्ये विशेष भर देण्यात आला.
सर्व ठिकाणी सहभागींचा उत्साह आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. या उपक्रमामुळे सकारात्मक आणि ऊर्जादायी वातावरण निर्माण झाले. नियमित व्यायाम आणि सजगता (माइंडफुलनेस) यांचा आरोग्यदायी व्यक्ती आणि सक्षम समाज घडविण्यात महत्त्वाचा वाटा असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्युअरशिप गडचिरोली येथेही आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 370 हून अधिक विद्यार्थी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी सहभाग नोंदवून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सर्वांगीण विकासाबाबतची आपली बांधिलकी व्यक्त केली.
यावेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमच्या सर्व युनिट्समधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. उत्तम आरोग्य आणि कल्याण जपण्यासाठी आमच्या कर्मचार्यांनी दाखविलेली सातत्यपूर्ण बांधिलकी आणि उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे. योग हा केवळ एका दिवसाचा उपक्रम नसून शारीरिक सामर्थ्य, मानसिक स्थैर्य आणि अंतर्गत संतुलन वाढविणारी जीवनशैली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो आणि सर्व कर्मचारी व सहकार्यांनी निरोगी सवयी आणि नियमित आरोग्यविषयक उपक्रम स्वीकारावेत, असे आवाहन करतो. आपण सर्वजण मिळून अधिक निरोगी, आनंदी आणि उत्पादक कार्यबल घडवू शकतो, असे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वी आयोजन हे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कर्मचारी कल्याण, कार्यस्थळावरील आरोग्यवर्धन आणि आरोग्य, तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देणारी कार्यसंस्कृती विकसित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे.