पावसासाठी पंढरपुरात विठ्ठल चरणी साकडे

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
नागपूर,
nagpur जून महिना संपायला आला असून अजून प्रयत्न पाऊसाला सुरवात झालेली नाही. शेतकरीराजा फार चिंतेत आहे. याकरीता हावरापेठ मधून भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर कार्यकारणी सदस्य - मंगेश मोरे, कार्यकर्ते - गजेंन्द्र मडावी‌,अनिकेत बांगडे, राजू इटनकर, बबलू वरठी व‌ संजय ऊईके यांनी क्षेत्र पंढरपूर गाठून महाराष्ट्रीचे आराध्य दैवत पाडूरंगाला साकडे घालून प्रार्थना केली. देवा विठ्ठला लवकरात लवकर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव सुखी-समृद्धि दिसू दे असी पाडुरंगाला (विठ्ठलाला) साकडे घातले व एक दिवसाचा उपवास करुन प्रार्थना केली.
 

nagpur 
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र