पंचायत समितीच्या अभियंत्यावर चाकूहल्ला

घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थीचे कृत्य

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
दर्यापूर,
knife-attack : प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकूल योजनेच्या थकित ५ हजार रुपयांच्या मागणीसाठी दर्यापूर पंचायत समितीतील घरकूल अभियंत्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेने पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली असून कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
 
JH
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड बु. येथील गब्बर नावाच्या व्यक्तीचा घरकुलाचा थकित ५ हजार रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी तो पंचायत समितीत वारंवार चकरा मारत होता. संबंधित व्यक्तीने अभियंत्याकडे मागणी केल्यावर अभियंत्याने पैशास नकार दिल्याचे म्हटल्या जात आहे. परिणामी संबंधित व्यक्तीने धारदार शास्त्राने वार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. अभियंत्याला तातडीने दर्यापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोएब शेख असे अभियंत्याचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पंचायत समितीतील कर्मचार्‍यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची नोंद दर्यापूर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
 
 
या हल्ल्यामुळे पंचायत समितीतील कर्मचारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. योजनेच्या नावाखाली अशा धमक्या आणि हल्ले वाढले आहेत. आम्हाला सुरक्षेची गरज आहे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षकांनी सांगितले.