नागपूर,
yoga day आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हुडकेश्वर पोलीस ठाण्यात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत विशेष योग शिबिर आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. हा कार्यक्रम नागपूर शहर परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात पार पडला.
योग शिक्षक आशिष कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग सत्रात सहभाग घेत उत्तम आरोग्य आणि मानसिक शांततेचा संदेश दिला. त्यानंतर नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, जगदीश पाटमासे तसेच लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन प्रभाकर विंचुरकर उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र