पुसद येथे खा. संजय देशमुखांच्या विरोधात निदर्शने

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
sanjay-deshmukh : उबाठा शिवसेनेच्या वतीने रविवार, 21 जून रोजी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय देशमुख यांचा निषेध करून निदर्शने करण्यात आली.
 
 
y22Jun-Deshmukh
 
 
 
खा. संजय देशमुख हे यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेनेच्या ‘मशाल’ या चिह्नावर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना शिवसैनिक, जनता व सामान्य गोरगरीब मतदारांनी तन-मन-धनाने पाठिंबा देऊन प्रचंड बहुमताने विजयी केले.
परंतु संजय देशमुख यांनी जनतेचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ ही घोषणाबाजी करण्यात आली. संजय देशमुख यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली.
 
 
या आंदोलनाचे नेतृत्व उबाठा शिवसेना माजी उपजिल्हा राजू वाकडे, माजी विधानसभा संघटक विजय बाबर, माजी शहरप्रमुख हरीश गुरुवानी, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल सहारे, विभाग प्रमुख राजू वंजारे, उप शहरप्रमुख रवी बहादुरे, विजय वानखेडे, विश्वंभर पाटील, ज्ञानेश्वर बोंबीलवार, गजानन निकस, तुषार व्यवहारे, सागर देवकुळे, कैलास जळगावकर, मनोज देवकुळे, कृष्णा काळे, विकी वाढवे, विजय पानपट्टे, अब्बास, संजय पोटे, विकी वानखेडे, सागर देवकुळे यांनी केले.