मुंबई,
Raj-Sharmila's special prediction मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय नाटक ‘ही दोस्ती तुटायची नाय’ ने यशस्वीपणे 50 प्रयोगांचा टप्पा गाठला. या खास सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला. सुमित राघवन आणि चिन्मयी सुमीत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. 50 व्या प्रयोगाच्या निमित्ताने रंगमंचावर आनंद, उत्साह आणि मैत्रीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमादरम्यान एक खास क्षण सर्वांच्या लक्षात राहिला. नाटकाच्या यशाचा आनंद साजरा करताना कलाकारांनी रंगमंचावर वातावरण अधिक रंगतदार केले. यावेळी लोकप्रिय गाण्याच्या तालावर शर्मिला ठाकरे यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर राज ठाकरे यांनाही या आनंदात सहभागी करून घेतल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या प्रसंगी उपस्थित प्रेक्षकांनी कलाकारांचे आणि पाहुण्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. रंगमंचावरील हा हलकाफुलका आणि आनंदी क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. नाटकाच्या टीमनेही या विशेष क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला.