डॉ. राजेंद्र मुंढे विदर्भ साहित्य संघाच्या शाखाध्यक्षपदी निवड

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
rajendra-mundhe : विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखेची सभा स्थानिक लोक महाविद्यालयात शनिवार १९ रोजी झाली. त्यात पुढील पाच वर्षासाठी प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांची शाखाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
 
 

JK 
 
 
 
वर्धा शाखेची गत पंधरा वर्षपासून धुरा सांभाळणारे संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सर्वसाधारण सभेत डॉ. राजेंद्र मुंढे यांचे नाव सुचविण्यात आले. त्याला सर्वानुमते संमती मिळाल्याने त्यांना शाखा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. अभिनंदन प्रस्ताव ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांनी ठेवला.
 
 
साहित्यिक व समीक्षक म्हणून लोकिक असणारे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी मनोगत व्यत करताना यापुढे सर्वांनी एकमत व एकदिलाने मिळून कार्य करू या. आपली शाखा विदर्भात अव्वल करू तसेच साहित्य विषयक विविध नवोपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यत केला.
 
 
सभेला विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्रा. सरोज देशमुख, प्रा. शेख हाशम, प्रा . महावीर पाटनी, सुरेंद्र वैद्य, जोत्स्ना भेंडे, नीळकंठ मेहर, प्रशांत पनवेलकर , उल्हास लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सचिव रंजना दाते यांनी केले तर आभार पदमाकर बाविस्कर यांनी मानले.