मुंबई
School Jihad in mumbai देशाच्या आर्थिक राजधानीत ‘स्कूल जिहाद’चा अत्यंत गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेने २०२१ ते २०२६ या कालावधीत तब्बल ८४९ शाळा अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३३ टक्के म्हणजेच तब्बल २८९ शाळा या केवळ गोवंडी आणि मानखुर्द या एकाच भागात असल्याचे सोमय्या यांनी उघडकीस आणले आहे.
School Jihad in mumbai किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
या अनधिकृत शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनी हडप केल्या जात आहेत. तसेच, या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून तीन-तीन मजल्यांच्या बेकायदेशीर इमारती उभारल्या जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या शाळा केवळ अनधिकृत बांधकामांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्यातून देशाच्या आणि शहराच्या सुरक्षेला थेट धोका पोहोचवणारे प्रकार घडत आहेत. या बोगस शाळांमधून बेकायदेशीर ‘शाळा सोडल्याचे दाखले’ वितरित केले जात आहेत. याच खोट्या दाखल्यांच्या आधारे आधार कार्ड, जन्मदाखले आणि बनावट मतदान ओळखपत्रे मिळवली जात असल्याचा अत्यंत गंभीर दावा सोमय्या यांनी केला आहे.
School Jihad in mumbai‘स्कूल जिहाद’ मोडून काढणार
एका विशिष्ट भागात बेकायदेशीर शाळांचे पेव फुटणे आणि त्यातून बोगस नागरिकत्वाची कागदपत्रे तयार होणे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. "हा उघडपणे 'स्कूल जिहाद' सुरू असून, तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबवू," असा सज्जड इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या 'स्कूल जिहाद'च्या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल घेत या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जाऊन या बेकायदेशीर शाळांवर धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
School