कोरडा ठणठणीत गेला जून

देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात कोरडा महिना सामान्यपेक्षा 42 टक्के कमी पाऊस

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
monsoon सध्या देशातील बहुतांश भागात पावसाची फक्त प्रतीक्षाच दिसते आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेला आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासात जून महिना दुसरा सर्वात कोरडा ठरण्याची चिन्हे आहेत. ४ जून ते २१ जून या कालावधीत देशात ५७.४ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्यपेक्षा ४२.२ टक्के कमी आहे.
delay1 
monsoon यापूर्वी 2009 मध्ये संपूर्ण जून महिन्यात अपेक्षित पावसापेक्षा ४९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला होता. यामुळे मध्य आणि वायव्य भारतातील शेतीवर वाईट परिणाम झाला होता. मात्र, मान्सून आता दोन आठवड्यांनंतर पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला छत्तीसगडपर्यंत पोहोचवेल.
monsoon हवामान विभागाने ईशान्य आणि पूर्व भारतात २५ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी मेघालयच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला. खासी हिल्स जिल्ह्यातील मॉसिनराम शहरात २४ तासांत ५३० मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे, एका रात्रीत येथे जेवढा पाऊस झाला, तेवढा पाऊस जोधपूर-बिकानेरमध्ये ६ महिन्यांत होतो.
monsoon राजस्थानमधील श्रीनगरमध्ये रविवारी गारपीट झाली. तर, मध्य प्रदेशातील ५ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील ३८ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते.
आठ राज्ये तापताहेत, विदर्भात रात्रीही उष्णतेची लाट
monsoon उत्तरप्रदेश, पूर्व मध्यप्रदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान ४०-४२ च्या दरम्यान आहे. तेलंगणा, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तरप्रदेशातील काही वेगवेगळ्या भागांमध्येही तापमान याच श्रेणीत आहे.
monsoonओडिशा आणि कर्नाटकमध्ये लोकांना दमट हवामानाचा सामना करावा लागू शकतो. विदर्भातील ८ जिल्ह्यांमध्ये सततच्या उष्णतेमुळे रात्रीही गरम होत आहेत. येथे रात्री उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बांदा सलग दुसèया दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे पारा ४२.६ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. याशिवाय कानपूर, वाराणसी, बहराइच आणि प्रयागराजमध्येही पारा ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला गेला. राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि हरियाणातील रोहतक येथेही पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर होता.