पुलगाव,
shreya-bhattad : येथील आर. के. कॉलनीचे रहिवासी विलास भट्टड यांची कन्या श्रेया हिने सीए परीक्षा उत्तीर्ण केली. माहेश्वरी समाजाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे तिला सीए फाउंडेशनकडून मदत मिळाली. श्रेयाचे वडील विलास भट्टड, व्यावसायिक तर आई सविता गृहिणी आहेत. तिचे माहेश्वरी समाजाचे शाम टावरी, किशोर लोहिया, संकट मोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष गिरीश चौधरी, मातृसेवा परिवाराचे अविनाश भोपे, रविशंकर केशरवाणी, कृषी केंद्र संचालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद फुलकरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, पाडवा पहाट आयोजन समितीचे गणेशराव इंगळे, विनोद सावसाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बहादूर चौधरी, आदींनी अभिनंदन केले