८६ टके मॅपिंग पूर्ण; ३० पासून मतदारांची पळताडणी सुरू

*जिल्हाधिकार्‍यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
वर्धा,
sir-work-underway : राज्यात पुनरीक्षण मतदार यादी (एसआयआर)चे काम सुरू आहे. सन २००२ नंतर प्रथमच प्रत्येक मतदाराची घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे. सदर कार्यक्रमात मतदार यादी पारदर्शक, अचूक अद्यावत व त्रुटीमुत होण्याकरिता दुबार नावे, अपात्र नावे व चुकीच्या नोंदी दुरुस्त केल्या जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ टके मॅपिंग झाली असून काही मतदारांचे स्थलांतर झाल्याने उर्वरित मॅपिंगची कामे शिल्लक आहेत. तीही कामे लवकरच पूर्ण होतील. दरम्यान, ३० जूनपासून मतदारांची पडताळणी तसेच नमुना फार्म भरून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज सोमवार २२ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
J
 
 
 
या कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलैपर्यंत मतदारांची पडताळणी आणि नमुना अर्ज भरून घेण्यात येणार आहे. तसेच २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच ५ ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या दरम्यान दावे व हरकती तर ५ ऑगस्ट ते ३ ऑटोबर दरम्यान दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ७ ऑटोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीत १८ वर्षे पूर्ण करणार्‍या युवकांचीही नावे समाविष्ट केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मतदार यादी अचूक, पारदर्शक तसेच कुणीही मतदानापासून वंचित राहू नये याकरिता १ जानेवारी २००२ ची मतदार यादी आधारभूत मानली जाणार आहे. यासाठी बीएलओंना २००२ ची मतदार यादीची प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सर्व पात्र मतदारांचा समावेश करण्यात येणार असून अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. नागरिकांनी बीएलओंना अधिकृत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी केले.
 
 
पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप वाघमारे उपस्थित होते.
 
२ हजार ८५९ बीएलएची नियुक्ती
 
 
जिल्ह्यात ११ लाख ३७ हजार २४२ मतदार असून ९ लाख ८३ हजार ३४० म्हणजेच ८६.४७ टके मॅपिंग झाली आहे. बीएलओंसह राजकीय पक्षातील बीएलए यांचीही नियुती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे १३४२, राष्ट्रवादी काँग्रेस १००, उबाठा गटाचे २४७ तर शिवसेनेचे ११७० याप्रमाणे २ हजार ८५९ बीएलएची नियुती करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी दिली.