तभा वृत्तसेवा
आर्णी,
ashwini-deshmukh : आर्णी येथे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) आगार, तसेच दुचाकी, चारचाकी पार्किंग व्यवस्था आणि बस स्थानकास सुरक्षा रक्षक मिळण्याची मागणी शिवसेना महिला आघाडी तालुका तथा शिवउद्योग संघटना यवतमाळ जिल्हाप्रमुख अश्विनी देशमुख यांनी शनिवार, 20 जून रोजी यवतमाळ येथे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आर्णी हा आदिवासीबहुल तालुका आहे. आर्णी हे तालुक्याचे ठिकाण तसेच बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. आर्णी शहराला 108 खेडे लागून असून तालुक्यातील लोक आर्णी येथे विविध कामांसाठी येत असतात. त्यांच्या ये-जा करण्याचे साधन एसटी बस हेच असून आर्णीत एसटीचे फक्त बस स्थानकच कार्यरत आहे.
येथून सुटणाèया बस या दिग्रस, दारव्हा, यवतमाळ येथून येणाèया असल्यामुळे आर्णी व परिसरातील लोकांना दारव्हा, दिग्रस, यवतमाळ या आगारांच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा या बसेस खूप उशिरा येतात, तर कधी कधी रद्दसुद्धा होतात. त्यामुळे विद्यार्थी, तसेच रुग्ण व इतर लोकांच्या कामांचा खोळंबा होतो.
एखादी बस नादुरुस्त झाल्यास अनेक तास प्रवासी खोळंबलेले असतात. तसेच येणाèया बस वाहतुकीसाठी अपुèया पडत असल्यामुळे आर्णी येथे आगार असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आर्णी बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार व बसस्थानकाच्या आतमध्ये अनेक दुचाकी, कार व अवैध प्रवासी वाहनांची गर्दी होत असते. बसस्थानकात बस आत आणतेवेळी किंवा बाहेर जातेवेळी अपघात होऊन जीवहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आर्णी बसस्थानक येथे पूर्णवेळ सुरक्षा रक्षक असणे तसेच पार्किंग सुविधा असणे अत्यंत गरजेचे असल्याने निवेदनात म्हटले आहे.