नळगंगा विहिरीतून पाणी उपशासाठी काम सुरू

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तभा इफेक्ट,
रिसोड, 
nalganga-well : शहरामधील पाणी टंचाई निवारण्यासाठी आज दि. २२ जून रोजी नळगंगा विहिरीवर मोटार पंप बसविण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने सुरू केले आहे.
 
 
 
J
 
 
 
रिसोड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अडोळ लघु सिंचन प्रकल्पात सात टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नगरपरिषद प्रशासनाने शहरातील जलस्त्रोत शोधून नागरिकांना पाणीटंचाई होणार नाही, यासाठी कार्यरत व्हावे. ग्रामपंचायत काळातील शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पोलिस स्टेशनच्या मागील नळगंगाच्या विहिरीला भरपूर पाणी आहे. या पाण्याचा वापर ज्या भागात टँकरने पाणीपुरवठा होतो, त्यासाठी शहरातील शौचालय व स्वच्छतागृहासाठी, गुरांना पिण्याचे पाण्याचा हौद भरण्यासाठी, रस्ता दुभाजकातील झाडांना पाणी देऊन जिवंत ठेवण्यासाठी करावा अशी बातमी तरुण भारतने दिनांक १८ जून रोजी प्रकाशित केली होती. त्याचा परिणाम म्हणून आज दिनांक २२ जून रोजी नळगंगा विहिरीवर मोटार पंप बसवण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने सुरू केले आहे. विहिरीतील हवेने उडालेला काडीकचरा साफ करून, विहीर परिसरातील स्वच्छता व पिण्याच्या पाणी पिण्या योग्य आहे की, नाही याची तपासणी करून या जुन्या नळगंगा विहिरीचा पाण्याचा उपयोग होणार आहे. जुन्या ग्रामपंचायत काळातील नळगंगा विहिरीतील पाण्याचा उपयोग होत असल्याने फिल्टर प्लांट करून टँकरने पुरवठा होणारे पाणी वाचणार आहे. त्यामुळे अडोळ लघु सिंचन प्रकल्पाचे पाण्या वरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.