यशवंत नगरमध्ये उत्साहात योग दिन साजरा

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
नागपूर,
yashwant nagar आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत नगर येथील खुल्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे ६० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
 
yashwant nagar
 
योग सत्रादरम्यान महिलांनी विविध योगासने आणि प्राणायाम करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन योग गुरू राखी विमला, गौरी सावरकर, अर्चना, संगीता, रेखा, कीर्ती, सुनीता, मधु, नेहा, लिपी आणि विशाखा यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये पार पडला.