वर्धा,
yoga-day : योगाच्या प्राचीन परंपरेत सदैव मानवाच्या अंतर्मनातील प्रबोधन आणि ज्ञानप्राप्तीवर भर देण्यात आला आहे. अनिष्ट व मानसिक गोंधळापासून मुत होण्याकरिता तसेच आत्म्याच्या शांततेच्या शोधात योगाचे विविध अंग आसन, प्राणायाम, ध्यान आणि नियम महत्वाचे मार्गदर्शक ठरतात. तंत्रज्ञानाच्या आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात मानसिक अस्थिरता आणि तणाव वाढत असताना नियमित योगाभ्यासामुळे मानसिक एकाग्रता, संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञानातील वाढ होते, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद यांनी केले.
अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर सभागृहात आयोजित योगदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी योगगुरू योगेश पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.
पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, प्राचीन भारतात योगाची परंपरा शाश्वत आहे आणि तिचे प्रवाह विविध ऋषी-मनीषींनी स्थापन केले. शिव, आदिशेष आणि महर्षि कणाद, जाज्वल्यम् इत्यादी ऋषी आणि त्यांच्या शिष्यांनी मंत्र, तंत्र आणि साधनेच्या विविध पद्धती विकसित केल्या. महर्षि पतंजलिंचे सूत्र संक्षिप्त, तर्कशील आणि अभ्यासोन्मुख आहेत, ज्यांनी योगाचे नैतिक, शारीरिक आणि मानसिक अंग एकत्र साधण्यावर भर दिला असे ते म्हणाले.
यावेळी योगेश पुरोहित यांनी योग विद्या या विषयावर मार्गदर्शन करीत विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करवून घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. नीरजसिंह यादव, डॉ. चंद्रकात कोठारे, डॉ. गजानन जंगमवार, डॉ. दीपक पुनसे, डॉ. अनिल महल्ले, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. दिनेश वंजारी, डॉ. रितेश सुळे, डॉ. प्रिया मिश्रा, प्रा. स्वरा अष्टपुत्रे, प्रा. निळकंठ ढोबाळे, अभिजित रघुवंशी, गणेश काळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.