तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
pm-kisan-samman-nidhi-distributed : कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र येथे उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी व विविध प्रकल्पातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी कृष्णराव देशट्टीवार, कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, गृहविज्ञान शास्त्रज्ञ स्नेहलता भागवत, कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. रूपेश झाडोदे उपस्थित होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्यदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगालमधील ताराकेश्वर, हुगळी येथून देशभरातील पात्र शेतकèयांच्या थेट बँक खात्यात पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याचे अॉनलाईन वितरण करण्यात आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 89 हजार 799 शेतकèयांचा समावेश आहे. त्यांनी खेत बचाव अभियान अंतर्गत मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खत वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी पीएम किसान योजनेच्या लाभांविषयी माहिती देत केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) योजनेची सविस्तर माहिती दिली व शेतकèयांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. दीपक कच्छवे यांनी उपस्थित शेतकèयांना खेत बचाव अभियान, आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी तसेच शाश्वत शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी उद्यान पंडित कृष्णराव देशट्टीवार यांच्यासह प्रगतिशील शेतकरी प्रभाकर ठाकरे, देवसिंग पवार, राहुल पारधी व बेबी रामदास ढोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय राहुल चव्हाण यांनी केले. कृषी विभागाचे प्रदीप वाहने तसेच विभागातील अधिकारी-कर्मचाèयांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सुमारे दीडशे शेतकरी, अधिकारी व पदाधिकाèयांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहून लाभ घेतला.