आजनसरा,
dattaji-meghe : एखादी व्यती आपल्यातून निघून गेल्यावरही त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देत असतात. याच भावनेतून आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिर परिसरात २२ रोजी स्व. दत्ता मेघे अन्नछत्र व धर्मशाळासाठी ठरविण्यात आलेल्या जागेची पाहणी करून फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजू मिश्रा, दत्ता मेघे फाउंडेशनचे मनिष वैद्य, ठेकेदार किशोर पघदम, स्थापत्य रचनाकार शशांक शर्मा, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे संयोजक व संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांची उपस्थिती होती.
डॉ. राजू मिश्रा म्हणाले की, दत्ता मेघे हे नाव नव्हते, ती एक चळवळ होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार होत आहे. येथे लवकरच उभे होणारे भवन विटा, सिमेंटचे नाही तर इथे येणार्या प्रत्येक ज्येष्ठांच्या चेहर्यावरचे हास्य हीच दत्ताजींना खरी श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले.
संत भोजाजी जेष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान आजनसराचे मार्गदर्शक कृष्णा पर्बत, अध्यक्ष गंगाधर कोल्हे, सचिव सुधाकर डेकाटे, उपाध्यक्ष जनार्धन जवंजाळ, रामकृष्ण कोपरकर, विश्वनाथ रेवतकर, नत्थूजी हुलके, लक्ष्मण ठाकरे, रमेशभाई पुसदेकर, विनोद जवंजाळ, ज्ञानेश्वर जवंजाळ, बंडू शंभरकर, मुरलीधर बारापात्रे, विठ्ठल कोल्हे, रमेश गौरशेट्टीवार, संत भोजाजी महाराज देवस्थानचे विश्वस्त शिवदास पर्बत, धनराज मेश्राम, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर, शालिनी ईखार, प्रशासकीय अधिकारी गणेश सोनोने, प्रसिद्धीप्रमुख डॉ. संदीप लोंढे यांची उपस्थिती होती.