ambulance driver murdered शहरालगत असलेल्या फुलचूर येथील कारंजा रोडवरील किसान चौक परिसरात एका 35 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 23 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनमोल रंगारी (35) रा. भद्रूटोला, कारंजा असे मृताचे नाव असून तो रुग्णवाहिका चालक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अज्ञात मारेकर्यांनी अनमोल रंगारी याच्या डोक्यावर एका धारदार हत्याराने वार केल्याने अधीक रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत पाहणी. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित केले. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार करून रवाना केली आहे.ambulance driver murdered तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या खूनप्रकरणामुळे फुलचूर व कारंजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.