दारव्हा तालुक्यात पावसाचे आगमन

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
rain-in-darwha : मृग नक्षत्र संपत आले तरी दारव्हा तालुक्यात अद्याप पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या ठप्प पडल्या होत्या. सोमवारी पावसाचे आगमन झाले. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे. अनेक शेतकèयांनी शेतात पेरणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
 
 

jlk 
 
 
 
या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला. खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतकèयांनी खते, बियाणे आणि कीटकनाशकाची जुळवाजुळव करून ठेवली होती. अनेकांनी कर्ज काढून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. मात्र पावसाअभावी हे सर्व साहित्य घरातच पडून होते.
 
 
पावसाच्या प्रतीक्षेत असताना पावसाचे आगमन हे महत्वाचे होते. दारव्हा तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पाऊस आगमनाने शेतकèयांच्या चेहèयावर आनंद दिसत असून उकाड्यापासूनही दिलासा मिळत आहे.