रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोच्या अध्यक्षपदी आशिष रेवतकर

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
ashish-revatkar : रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोचा १६वा पदग्रहण सोहळा आणि चार्टर डे उत्साहात साजरा करण्यात आला. नॉर्थ अंबाझरी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथे झालेल्या या सोहळ्यात रोट. ॲड. आशिष रेवतकर यांनी अध्यक्षपदाची, तर रोट. डॉ. सुजाता देव यांनी मानद सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.
 

ngp 
नवनियुक्त अध्यक्ष आशिष रेवतकर यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या 'सेवा हेच ध्येय' या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
 
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. अजिंक्य देशमुख यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक समाजातील तिची भूमिका यावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या परिवहन समितीच्या अध्यक्षा मंगला खेकारे यांनी समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
 
या प्रसंगी राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक गोविंद पोद्दार यांच्या हस्ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि प्रमुख अतिथींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक रोटेरियन, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.