बँकेच्या अभिकर्त्याला लुटले

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
सेलू, 
robbery-case : येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या दैनिक अभिकर्ता रात्री घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
 

j 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार. सोमवार २२ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास येथील आठवडी बाजारातून विकास चौकात असलेल्या घरी सायकल ने जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांची सायकल अडवत डोळ्यात मिरची पूड फेकून पैशांची बॅग व मोबाईल हिसकावून नेली. सकाळपासून तर रात्रीपर्यंत वासुदेव घवघवे हे दुकानदारांकडून बँकेची दैनिक ठेव स्वीकारतात. चोरट्यांना त्यांच्या बॅगमध्ये रक्कम असावी म्हणून त्यांनी बॅग व मोबाईल घेऊन पळ काढला. परंतु,वसुली केलेली रकम घवघवे यांच्या पॅन्टच्या खिश्यात असल्याने ती रकम वाचली. या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.