उमेश ताकसांडे,
वर्धा,
sir-in-wardha : आजपासुन १५ वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसमय असलेला वर्धा जिल्हा आज भाजपामय झाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक रचना एवढी माघारली की त्यांना मतदार यादी पुनरीक्षणाकरिता आपल्या पक्षातील कार्यकर्तेही पाठवणे शय झाले नाही. भाजपासह अन्य पक्षांनी आपले बिएलएची मोठी फळी तयार केली असताना काँग्रेस शुन्यात खेळत असल्याने हे संघटनात्मक अपयशच म्हणावे लागेल.
मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यासाठी १३४२ बीएलओची नियुती करण्यात आली. राजकीय पक्षाकडून बीएलए म्हणजेच मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी नियुत करण्याची जबाबदारी राजकीय पक्षाची आहे. पण, भाजपा आणि शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षाने पाचशेच्या वर आपले प्रतिनिधी नियुतच केले नाही. निवडणूक विभागाच्या आकडेवारीत काँग्रेसचे बीएलए शून्यच आहे.
वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, देवळी आणि वर्धा असे चारही मतदार संघ मिळून एकूण मतदार संख्या ११ लाख ३७ हजार २४२ इतकी आहे. यात ९ लाख ८३ हजार ३४० इतया मतदारांचे मॅपिंग झाले, मात्र १ लाख ५३ हजार ९०२ मतदार हे अनमॅप आहे. सुमारे १४ टके मतदार हे मतदान यादीमधून बाद होण्याची शयता आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ सोबतच राजकीय पक्षांचे केंद्र निहाय प्रतिनिधी यांची मोठी जबाबदारी मानली जाते. मतदार यादीच्या सर्व भागाकरिता बीएलए यांची नेमणूक करण्याच्या सूचना सर्वच राजकीय पक्षांना देण्यात आल्या. त्यांनी बीएलओ सोबत समन्वय साधून मतदार यादी शुद्धीकरणाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. वर्धा जिल्हा निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि उबाठा गट वगळता इतर राजकीय पक्षाने अजूनही प्रतिनिधी नियुत केले नाही. भाजपाचे १३४२, राष्ट्रवादीचे १००, शिवसेनेचे ११७० तर उबाठा गटाकडून २४७ बीएलए नियुत करण्यात आले आहे. परंतु, काँग्रेस, राकाँ शप गट, बसपा, मनसे, आप या राजकीय पक्षाने अजून आपले प्रतिनिधी म्हणजेच नियुत केले नाहीत.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाने एसआयआरवर आरोप केले आहेत. परंतु, प्रत्यक्ष त्यावर नजर ठेवण्याची वेळ आली असता काँग्रेससह कोणत्याही घटक पक्षाने आपले प्रतिनिधी नियुत केले नाहीत. मतदान केंद्र निहाय पडताळणीसाठी विरोधी पक्षाने देखील आपले बीएलए नियुत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.