भा,.म. सं. प्रादेशिक महामंत्रीपदी हर्षल ठोंबरे

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर,
harshal-thombre : भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशाच्या महामंत्रीपदी हर्षल ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी (ओडिशा) येथे झालेल्या अखिल भारतीय अधिवेशनानंतर विदर्भ प्रदेशाचे महामंत्री गजानन गटलेवार यांची भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या विशेष कार्यसमिती बैठकीत ठोंबरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
 
 

jlk 
 
 
प्रदेशाध्यक्ष रवींद्र गणेशे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय उपाध्यक्ष निता चौबे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य गजानन गटलेवार, सहसंघटन मंत्री मोहन येणूरे तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
 
- दोन दशकांचा संघटनात्मक अनुभव
 
 
हर्षल ठोंबरे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भारतीय मजदूर संघाच्या कार्यात सक्रिय आहेत. आयुध निर्माणी (डिफेन्स), अंबाझरी येथे कार्यरत असलेले ठोंबरे हे तेथील कामगार संघटनेचे राष्ट्रीय मंत्री तसेच जेसीएम-III सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. संघटित आणि असंघटित कामगार क्षेत्रातील त्यांचा अनुभव व नेतृत्वगुण लक्षात घेऊन त्यांच्यावर विदर्भ प्रदेशाच्या महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
- गटलेवार यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी
 
 
दरम्यान, गजानन गटलेवार यांची अखिल भारतीय कार्यसमितीवर सदस्य म्हणून निवड झाली असून, देशातील जलनिगम आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स उद्योग क्षेत्रातील कामगार व संघटनांच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ठोंबरे यांच्या निवडीचे कामगार, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, विदर्भातील संघटनात्मक कार्याला नव्या गतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.