जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
international-yoga-day : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्त साधून सोमवार, 21 जून रोजी सकाळी 6 वाजता पतंजली योग समिती व जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था यवतमाळच्या वतीने व प्रमोदजी महाजन चॅरिटेबल ट्रस्ट, मेरा युवा भारत यवतमाळच्या सहकार्यातून स्थानिक साई मंदिर, ईश्वरनगर वडगाव रोड यवतमाळ येथे बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
 
 

y23Jun-Tuljai 
 
 
 
यावेळी या कार्यक्रमाला डॉ. अंजली गवार्ले, मुख्य योग शिक्षक भास्कर मोघे व प्रकल्प अधिकारी आकाश धुरट, अध्यक्ष दर्शन बेंद्रे व योगशिक्षक मोहना चिद्दरवार उपस्थित होत्या. यावेळी डॉ. गवार्ले यांनी योग दिनाविषयी मार्गदर्शन केले.
 
 
त्या म्हणाल्या, नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने शारीरिक तणाव दूर होतो, मानसिक आरोग्य सुधारते, स्नायूंची लवचिकता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. योग ही निरोगी आणि तणावमुक्त जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे, जी सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
 
 
यावेळी साई योग ग्रुप, स्वामी समर्थ योग ग्रुप, गुरुकृपा नगरी, हनुमान योग ग्रुप, सत्यनारायण लेआऊट व शिवयोग ग्रुप शिवनगर येथील महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
 
 
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष पवन धुरट, आकाश धुरट, जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था उमरसरा यांनी केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनीषा आडे व मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे पस्थित होते.