एवोनिथ स्टीलतर्फे कबड्डी निवड चाचणीचे आयोजन

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
वर्धा,
kabaddi-selection-trials : एवोनिथ स्टील कंपनी, स्पोर्ट्स व्हिलेज फाउंडेशन आणि वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या संयुत विद्यमाने माजी खासदार रामदास तडस इंडोर स्टेडियम, देवळी येथे कबड्डी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रतिभावान मुला-मुलींना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
 
 
 
jh
 
 
 
एवोनिथ योद्धा लबसाठी ही निवड चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले.
 
 
कार्यक्रमाला वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, माजी खासदार रामदास तडस, देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, देवळी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कापडे, एवोनिथ स्टीलचे मानव संसाधन प्रमुख आर. के. शर्मा, सीएसआर प्रमुख अमिता चौरासिया, ब्रँडिंग प्रमुख संदीप नाडकर्णी, सलोनी सराफ, दीपक तपासे, समीक्षा वडूरकर, सोनाली भुते, शुभम मोरे, सायली कदम, स्पोर्ट्स व्हिलेज फाउंडेशनचे प्रमुख परमिंदर गिल तसेच दादासो अवाड वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे सहाय्यक प्रशिक्षक उपस्थित होते.