पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी कॅप नोंदणीला सुरुवात

- ९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
law-course-cap-registration : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) अंतर्गत ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. १९ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया ९ जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, ५-वर्षीय एलएलबी सीईटी-२०२६ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी ही नोंदणी अनिवार्य आहे.
 
 
 
cap
 
 
उमेदवारांनी अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आणि स्वाक्षरी विहित जेपीजी/जेपीईजी स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती PDF स्वरूपात सादर कराव्या लागतील. आवश्यक कागदपत्रांची सविस्तर यादी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
- २९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
 
 
यंदाची ५-वर्षीय एलएलबी सीईटी-२०२६ परीक्षा ८ मे रोजी पार पडली होती. या परीक्षेला २९ हजार २८८ उमेदवार उपस्थित होते. परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात आला असून, आता प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू झाला आहे.
 
- वेळापत्रकावर ठेवा लक्ष
 
 
प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पे, गुणवत्ता यादी, महाविद्यालयीन पसंती आणि इतर महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती नियमितपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.