लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या रोशनने पटकाविला प्रथम क्रमांक

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
गडचिरोली, 
roshan-bodalkar : गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रन गडचांदूर मॅरेथॉन 2026 स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचा खेळाडू रोशन बोडलकर याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
 

j  
 
 
 
या स्पर्धेत अनेक धावपटूंनी सहभाग घेतला होता. कडव्या स्पर्धेत रोशनने आपल्या उत्कृष्ट सहनशक्ती, जिद्द आणि खेळातील कौशल्याच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद मिळविले. त्याच्या या यशामुळे लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रोशनच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक असल्याचे मानले जात आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकादमीचे व्यवस्थापन, प्रशिक्षक तसेच सहकारी खेळाडूंनी त्याचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
रोशन बोडलकरचे हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत असून लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये घडत असलेल्या गुणवंत खेळाडूंच्या यशस्वी वाटचालीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे मानले जात आहे.