वर्धा,
agriculture-award : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत सन २०२३ च्या विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर विभागांतर्गत वर्धा जिल्ह्यातील युवा महिला शेतकरी प्रतिभा महाजन आणि शासकीय श्रेणीतील पुरस्कारासाठी उप कृषी अधिकारी मनोज गायधने यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व मार्गदर्शक कार्य करणार्या राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी अधिकार्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
जिल्ह्यातील पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा महाजन यांची युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी शेतीमध्ये राबविलेले नावीन्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबाबत पुरस्कारासाठी तर गिरड येथे कार्यरत असलेले उपकृषी अधिकारी मनोज गायधने यांची नागपूर विभागातून शासकीय श्रेणीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही पुरस्काराच्या निवडीबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, कृषी विभागाचे अधिकार्यांनी अभिनंदन केले. या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील इतर युवा शेतकर्यांना तसेच कृषी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचार्यांना प्रेरणा मिळणार आहे, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी व्यत केला.