देवळी,
police-distributed-helmets : दिवसांदिवस रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण तसेच अमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी देवळी पोलिस स्टेशनच्या वतीने शहरात जनजागृती दुचाकी रॅली आज मंगळवारी काढण्यात आली. यावेळी ६५ वाहन चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे व ठाणेदार संदीप कापडे यांनी रस्ते सुरक्षा नियम, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, सीटबेल्ट व हेल्मेटचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन करून वाहन न चालविण्याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या हस्ते महालक्ष्मी प्रा. लि.एच आर नाथ व ठाणेदार संदीप कापडे यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. रॅलीत पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, पोलिस उपनिरीक्षक कल्पेश मगरे, पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, पोलिस पाटील, महालक्ष्मी कंपनीचे कर्मचारी तसेच शहरातील सुमारे २५० ते ३०० दुचाकी चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.