देऊळगाव राजा,
prof vijay rathi शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात तत्वनिष्ठ व बहुआयामी व्यक्तिमत्व चे धनी ठरलेले एक अभ्यासू आदर्श प्राध्यापक, अत्यंत प्रामाणिक आणि विद्वान आणि प्रेरणा दायी व्यक्तिमत्व माजी आमदार बी टी देशमुख 19 जुन रोजी पडद्याआड गेले, प्रा बी टी देशमुख 1980 ते 2010 पावेतो सलग 6 टर्म म्हणजे एकूण तीस वर्षे महाराष्ट्र विधानपरिषदेत अमरावती पदवीधर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

कोणताही राजकीय पक्ष त्यांनी स्वीकारला नाही, अभ्यासू वृत्ती, प्रचंड मेहनत, आणि इमान, धारदार निर्भिडपने विधिमंडळात भाषण शैली आणि आकडेवारी च्या अभ्यासपूर्ण भाषणाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक सरकारला झुकविले, राज्यसरकार द्वारा बी टी देशमुख यांना उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार दोन वेळा देऊन सन्मानित करण्यात आले होते, गांधी विनोबा विचारक व खादीधारी प्रा बी टी देशमुख सरांनी विदर्भाच्या सिंचन व विकास अनुशेष निर्मूलन चा प्रश्न आयुष्यभर लाऊन धरला, प्रा बी टी देशमुख सर शिवाजी शिक्षण संस्थेचे वैभव होते, आमदारकीच्या 30 वर्षात विना वेतन रजा घेऊन संपूर्ण समाजाची अनोखी समाजसेवा केली, ते राज्यातील संपूर्ण शिक्षक वर्गासाठी एक प्रमुख आधारस्तंभ ठरले होते, असा आमदार आता होणे नाही, अशी प्रतिक्रिया राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा विजय राठी यांनी दिली आहे.prof vijay rathi प्रा विजय राठी हे बी टी देशमुख यांना आपले गुरु मानायचे , गुरूंना श्रद्धांजली म्हणून मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प घेत असल्याचे प्रा विजय राठी यांनी सांगितले,