पुसदमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

गुणवंतांचा सत्कार

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
pusad-international-yoga-day : महाराष्ट्र योग शिक्षक संघ व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन विरंगुळा योगकेंद्र येथे मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाèया या कार्यक्रमास योगसाधक, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महाराष्ट्र योगशिक्षक संघ दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करीत असतो.
 
 
 
kl;
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. त्यांचा सत्कार महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांनी शाल, पुष्पगुच्छ, योगानुभूती पुस्तक व विद्या वनस्पतीचे रोपटे देऊन केला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार उपस्थित होते.
 
 
यावेळी प्रा. गोविंद फुके, रूपाली जयस्वाल, विलास पलीकोंडावार, बाळासाहेब माने, योगेश पाली, मोहन सर्फे, शैलजा मडके, कल्पना मस्के, अ‍ॅड. बापुराव मस्के, राजू सोनुने या मान्यवरांसह तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
 
यावेळी समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देणारे गिरीश अनंतवार यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तन्मय मडके यांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय नीट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करणारी सिद्धी शैलेश चिद्दरवार हिचा सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांनी केले. संचालन व आभार जिल्हाध्यक्ष मनोज नाईक यांनी मानले. या कार्यक्रमाला योग शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य, योगशिक्षक, योगसाधक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.