वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
rain-yavatmal-district : अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची वाट पाहणाèया शेतकèयांच्या आता आशा पल्लवित झाल्या. सोमवार, 22 जूनच्या रात्री पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. उर्वरित पेरणी करण्याची लगबग शेतकèयांमध्ये सुरू झाली असून तो या पावसाच्या आगमनाने आनंदला आहे.
 
 

y23Jun-Perani 
 
 
 
मृग नक्षत्रामध्ये शेतकèयांनी शेतामध्ये पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारलेली होती. त्यामुळे अनेक शेतकèयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. शेतकरी राजा हा चातकासारखा पावसाची वाट बघत होता. दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी पावसाची रिपरिप सुरू झाली आणि रात्री धो-धो पाऊस बरसला.
 
 
शेतात बियाणे पेरून पावसाची वाट बघणाèया शेतकèयांच्या डोळ्यांमध्ये पडलेल्या पावसामुळे आनंदाश्रू अवतरले. कारण पेरणी झाल्यानंतर पावसाची वाट पाहत अनेक शेतांतील बियाणे खराब झाले. तर काही शेतातील बियाणे तर उगवलेच नाही. अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली होती.
 
 
आता शेतीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला पुन्हा नव्याने लागलेला आहे. शेतीमध्ये डवरणी आणि फवारणीचे कामसुद्धा जोमाने सुरू झाले असून पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
 
--------------
 
 
घाटंजी तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी
- चित्रा नक्षत्राच्या पावसाने परिसर सुखावला
तभा वृत्तसेवा
पारवा, 
घाटंजी तालुक्यातील पारवा आणि परिसरात मंगळवारी दुपारी दीड वाजता आलेल्या पावसाने वादळी वाèयासह दमदार हजेरी लावली. चित्रा नक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या या जोरदार पावसाने गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला असून, परिसरात गारवा निर्माण झाला आहे.
 
 
या पहिल्याच मोठ्या पावसाने परिसरातील बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मंगलवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पारवा परिसरात मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि सखल भागांमध्ये पाण्याचे लोंढे वाहू लागले. परिसरातील छोटे-मोठे नाले आणि ओढे प्रवाहित झाले.
 
 
अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर काहींनी झाडांचा व दुकानांचा आडोसा घेतला. अनेक दिवसांपासून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. चित्रा नक्षत्रात झालेल्या मंगळवारच्या चांगल्या पावसाने सुकलेल्या धरणीमातेला नवसंजीवनी मिळाली आहे.