मुंबई,
Raja Shivaji Takes OTT by Storm 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि बॉक्स ऑफिसवरही त्याने विक्रमी कमाई नोंदवली. आता ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ‘राजा शिवाजी’ लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून प्रेक्षक घरबसल्या हा भव्य ऐतिहासिक चित्रपट अनुभवू शकणार आहेत.
चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चर्चेनुसार हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच चित्रपटाने विक्रमी कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. देशांतर्गत तसेच जागतिक बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने शानदार यश मिळवले आहे.
रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे आणि दिग्दर्शनही करत आहे. त्याच्या अभिनयासोबतच भव्य सेट, प्रभावी दृश्ये आणि परिणामकारक कथानकाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली. या चित्रपटात संजय दत्त, जेनेलिया देशमुख, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका विशेष चर्चेत होत्या. आगामी ओटीटी प्रदर्शनामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनेल.