कर्जमाफीसाठी शेतकरी बैलावर बसून तहसील कार्यालयात

कर्मचारी व अधिकारीही अवाक्

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
राजुरा, 
rajura farmer शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना व्यक्त करीत, राजुरा तालुक्यातील गोयगाव येथील शेतकरी देवराव पाहाणपटे मंगळवार, 23 जून रोजी कर्जमाफीची घोषणा करीत चक्क आपल्या बैलावर स्वार होऊन तहसिल कार्यालयात पोहोचले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.
 

rajura farmer 
 
 
सकाळी सुमारे 11 वाजता पाहाणपटे बैलावर बसून राजुरा तहसील कार्यालय परिसरात पोहोचले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या ही त्यांची प्रमुख मागणी होती.यासोबतच परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. महामार्ग प्रकल्पामुळे अनेक शेतजमिनी बाधित होत असून शेतीचे नुकसान, पाण्याच्या निचर्‍याचे प्रश्न, शेतरस्त्यांची गैरसोय आणि वाहतुकीच्या अडचणी वाढल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी हा दिलासा देणारा उपाय असल्याचे ते म्हणाले.rajura farmer  शेतकरी आजही बैलाशी नाळ जोडून शेती करतो आणि म्हणून शेतकर्‍याच्या वेदना शासनापर्यंत पोहचवण्यासाठी बैलावरून तहसील कार्यालयात आलो, अशी भावना पाहाणपटे यांनी व्यक्त केली.