वर्धा,
tobacco-and-pan-masala-seized : स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध विभागाने संयुत कारवाई करून १२.२९ लाखांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त केला. ही कारवाई भामटीपुरा परिसरात २२ रोजी करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी पोलिसांचे सहकार्य घेत भामटीपुरा परिसरातील ताज किराणा दुकानावर छापा टाकला. पाहणी केली असता तेथे सुगंधीत तंबाखू, पानमसाला मिळून आला. तो जप्त करून शेख इम्रान शेख सुलतान उर्फ सोनू सुपारीवाला रा. भामटीपुरा याला अटक केली. शेख इम्रान शेख सुलतान याने प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याची तीन वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक केली होती. त्या तिन्ही ठिकाणाहून १२ लाख २९ हजार ८७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे उपायुत प्रफुल्ल टोपले, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक विलास पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्म, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रावण पवार, अमोल ढोबाले आदींनी केली.