बहिणीच्या प्रियकराकडून भावावर प्राणघातक हल्ला

लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार; गंभीर जखमीवर उपचार सुरू

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
murderous attack on her brother मावस बहिणीला मारहाण करणाऱ्या भावावर तिच्या प्रियकराने साथिदारासह प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर भावानेही चाकूने वार करीत प्रत्युत्तर दिले. ही थरारक घटना शांतिनगर पोलिस ठाण्यांतर्गत प्रेमनगर-साईनगर परिसरात उघडकीस आली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरेश असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

crime 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश हा आपल्या मावस बहिणीच्या घरी गेला होता. यावेळी घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याने मावस बहिणीला मारहाण केली. त्यानंतर नरेश तेथून निघून गेला. काही वेळानंतर बहिणीचा प्रियकर अण्णा याने नरेशला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. २० जूनच्या रात्री प्रेमनगर येथील हनुमान मंदिरासमोर दोन्ही बाजू आमनेसामने आल्या. आरोप आहे की दिवाकर हा त्याचा साथीदार आयूष ऊर्फ कालू याच्यासह दुचाकीवर तेथे पोहोचला. त्यानंतर दिवाकरने लोखंडी रॉडने नरेशच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, तर आयूषने धारदार कोयत्याने डोक्यावर आणि छातीवर वार केले.
 
 
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नरेशला तातडीने मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिताच्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत असून हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचाही तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.