मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांना ऑनलाइन प्रशिक्षण

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
online-training-for-officers-and-staff : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नव्याने पात्र ठरणार्‍या मतदारांचा समावेश, स्थलांतरित व मयत मतदारांची नोंद अद्ययावत करणे तसेच प्रत्येक मतदाराची माहिती पडताळून पाहण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानुसार २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत तयारी, प्रशिक्षण तसेच छपाईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
 
 
 
h j
 
 
 
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पी. एम. साने यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील जिजाऊ सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचे अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधिर खांदे, उपजिल्हाधिकारी अजिंय घोडके, उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपविभागीय अधिकारी जयश्री ठाकरे, तहसीलदार वृशाली केसकर, तहसीलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते.
 
 
 
या प्रशिक्षणामध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी बीएलओ यांनी नवीन मतदार, स्थलांतरित मतदार तसेच मयत मतदार यांचे अर्ज कशाप्रकारे भरून घ्यावेत, त्यांची अचूक नोंद कशी करावी आणि पडताळणी प्रक्रिया कशाप्रकारे राबवावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश होईल आणि मतदार यादी अद्ययावत व त्रुटीमुक्त राहील, यासाठी काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना पी. एम. साने यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.