तभा वृत्तसेवा
कळंब,
killed-in-lightning-strike : मंगळवार, 23 जून रोजी दुपारी 4 च्या सुमारास उमरी येथील वाल्मिक विठ्ठल भोयर यांच्या शेतात वीज पडून निखिल वाल्मिक भोयर (वय 35) आणि भीमराव रामभाऊ लाटकर (वय 60) यांचा मृत्यू झाला असून साहिल भीमराव लाटकर (वय 19) हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
मंगळवारी शेतात काम करण्याकरता गेले असता या तिघांनीही पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे शेतामध्ये असलेल्या झाडाखाली आश्रय घेतला होता. अचानक दुपारी पावणेचारच्या दरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वीज वीज झाडाखाली बसून असलेल्या या तिघांच्या अंगावर पडली.
यात दोघेजण जागीच मृत्युमुखी पडले आणि एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना कळंबचे तहसीलदार धीरज स्थूल यांना मिळताच त्यांनी तातडीने आपले पथक उमरी गावात दाखल केले. या घटनेमुळे उमरी गावात शोककळा पसरली असून गावातील तरुण मुलगा व त्याच्यासोबतच्यांच्या जाण्याने हळहळ आहे.