उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर

संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांची माहिती

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
uddhav-thackeray : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रव्यापी दौरा करणार आहेत. याची सुरुवात ते यवतमाळपासून करणार असून, शुक्रवार, 26 जून रोजी यवतमाळ येथे मुक्कामी येणार आहेत. शनिवार, 27 जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात सकाळी 10.30 वाजता त्यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी मंगळवार, 23 जून रोजी पत्रपरिषदेत दिली.
 
 

hjk 
 
 
 
या पत्रपरिषदेत जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, सागर पुरी उपस्थित होते. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी मंत्री आदित्य ठाकरे, नेते व खासदार संजय राऊत, नेते खासदार अरविंद सावंत, नेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे हे पीक विमा तसेच इतर विविध विषयांवर मत व्यक्त करणार आहे.