वडकीत कृषी केंद्र चालकांकडून वरुणराजाला साकडे

-‘धोंडी धोंडी पाणी दे..’च्या जयघोषात काढली मिरवणूक -पावसासाठी केली गजाननाला प्रार्थना

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
vadki-agro-input-dealer : तालुक्यातील वडकी परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर वडकी येथील कृषी केंद्र चालकांनी पुढाकार घेत वरुण राजाला साकडे घालत पारंपरिक पद्धतीने ‘धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत कृषी केंद्र चालकांसह शेतकरी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
 
 
y23Jun-Sakade
 
 
 
गावातील प्रमुख मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकèयांच्या शेतात हिरवाई यावी आणि खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, यासाठी वरुण राजासह गजाननाला प्रार्थना करण्यात आली.
 
 
विशेष म्हणजे मिरवणुकीनंतर वडकी बसस्थानक परिसरात उपस्थित नागरिक व प्रवाशांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अन्नदान करतानादेखील वरुणराजाची आराधना करण्यात आली. अन्नदाता सुखी राहावा, शेतकèयांच्या घरात पुन्हा आनंद यावा आणि पावसाने सर्व संकटे दूर करावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
 
शेतकèयांसाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नसून संपूर्ण वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. बियाणे, खतांची तयारी करून बसलेल्या शेतकèयांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाचा विलंब झाल्याने अनेक शेतकèयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
कृषी केंद्र चालकांनी केवळ आपल्या व्यवसायापुरते मर्यादित न राहता शेतकरी बांधवांच्या समस्येशी जोडलेली सामाजिक भावना या उपक्रमातून दाखवून दिली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे वडकी परिसरात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. पाऊस हा शेतकèयांच्या जीवनाचा आधार आहे. वेळेवर पाऊस झाला तरच शेतीचे चक्र सुरळीत राहते. त्यामुळे करून वरुणराजाने कृपा करून लवकर पाऊस पाडावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
 
 
दरम्यान निसर्गाच्या कृपेची वाट पाहणाèया शेतकèयांसाठी प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.