शिक्षक निघाले रस्त्याने दंडवत घालत!

*राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : टीईटी सती विरोधात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात व प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे दंडवत आंदोलन करण्यात आले. अजय भोयर, विजय कोंबे सह अनेक शिक्षक दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
 
 

jlk 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ व २९ मे २०२६ च्या निर्णयानुसार शिक्षकांनी टीईटी परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत उत्तीर्ण करण्याचे आदेश दिले. ती परीक्षा पात्र न ठरल्यास शिक्षकांना पदोन्नती मिळणार नसून १ सप्टेंबर २०२८ नंतर त्यांना सेवामुत करण्यात येणार आहे. हा निर्णय शिक्षण व्यवस्था कोलमडून टाकणारे असल्याने ते न्यायसंगत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे .
 
 
२०-२५ वर्षाची अखंड सेवा पूर्ण केल्यानंतर सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी मध्येच कोणत्याही परीक्षेची सती केली नाही. टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणून त्यांना सेवामुत करणे हे न्याय संगत नसल्याने देशातील कोणत्याही शिक्षकावर टीईटी अभावी अन्यायकारक कृती होणार नाही यासाठी योग्य त्या पर्यायांचा अवलंब करून लाखो शिक्षकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्यासाठी हे दंडवत आंदोलन करण्यात येत असल्याचे अजय भोयर यांनी सांगितले.
 
 
यावेळी पुंडलिक नाकतोडे, मुकेश इंगोले, नरेंद्र थुटे, प्रीती शर्मा, धनराज कावटे, इम्रानुल्ला खान, प्रवीण घोडखांडे, राजीव धात्रक, उमेश खंडार, रहीम शहा, दत्तात्रय राऊळकर, संजय बारी, विलास बरडे, रत्नाकर निखारे, रवींद्र उईके, धीरज समर्थ, अजय बोबडे, सुधीर सगणे, उर्मिला चौधरी, रत्नमाला कन्नाके, दीपाली राडे, अजय काकडे, अजय मोरे, अतुल उडदे, आदींसह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.