विदर्भात 21 जून नंतर पाऊस बसणार..हवामानअभ्यासक प्रकाशभाई पारेख यांचा अंदाज ठरला खरा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
खामगाव, 
prakashbhai parekhs यंदा सुपर एलनिनो च्या वाढलेल्या प्रभावाने यंदाच्या पावसाळ्यातील मान्सूनचा पाऊस विदर्भातील विविध भागात 21 जून नंतर बसेल असा अंदाज येथील हवामानाचे गाढे अभ्यासक प्रकाशभाई पारेख यांनी वर्तविला होता त्या अंदाजा नुसार जिल्ह्यासह विदर्भातील अनेक गावांमध्ये 22 जून रोजी पावसाचे आगमन झाले आणि चांगला पाऊस झाल्या मुळे त्यांनी वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.त्यामुळे त्यांचे शेतकरी व नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. प्रकाशभाई पारेख हे गत 55 वर्षापासून पाऊस केव्हा पडणार याचा अभ्यास करीत आहे.या अभ्यासातून त्यांना मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.यंदा पावसाची स्थिती काय राहील ? याची माहिती जाणून घेण्यासाठी पावसाळा लागण्याच्या काही दिवस अगोदर केवळ विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक गावातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून पावसाची माहिती जाणून घेण्यात येते आणि कोणताही मानपान न घेता ते आपला अंदाज व्यक्त करतात. त्यांच्या या अभ्यासाला व छंदाला पावसाळ्याच्या दिवसात अधिक महत्त्व प्राप्त होते.

prakashbhai parekhs 
 
 
सुपरएलनिनो ने पाऊस लांबणार
प्रकाशभाई पारेख यांनी यंदा फेब्रुवारी महिन्यातच एलनिनो येणार आणि त्याचे रूपांतर मे महिन्यात सुपरएलनिनो मध्ये होईल.व पाऊस उशिरा पडेल अशि भाकिते वर्तविली होते. आणि ति दोन्ही भाकीते खरी ठरली आहेत. मे महिन्याच्या आरंभी सुपर एलिनो कार्यान्वित झाला याचा परिणाम उन्हाच्या तीव्रतेवर दिसून आला यंदा मे महिन्यात गत 10 ते 20 वर्षे एवढे ऊन तापले नव्हते तेवढे ऊन तापले एवढेच नव्हे तर अधून मधून उष्ण वारे वाहत होते. खामगाव शहराच्या तापमानाचा विचार केला तर यंदा शहराचे तापमानाने 45 अंश सेल्सिअस चा पारा गाठला होता. दरवर्षी मृग नक्षत्र लागल्यानंतर साधारणतः आठवडाभरानंतर कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस बरसतो पण यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडा गेल्या आद्रा नक्षत्राच्या आरंभी 22 जून रोजी यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पाऊस जिल्ह्यातील अनेक गावांसह विदर्भत बरसला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल
भारतीय हवामान खात्याने यंदा 15 किंवा 16 जूनला मुंबई त्यानंतर 2 - 3 दिवसांनी विदर्भात पाऊस बसेल असा अंदाज वर्तविला होता परंतु हवामान खात्याचा अंदाज पण फोल ठरला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पाऊस हा विदर्भातील अनेक गावांमध्ये 22 जून 26 रोजी बरसल्याची माहिती मिळाली आहे परंतु प्रकाशभाई पारेख यांनी 21 जून नंतर पाऊस विदर्भातील असा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या अंदाजावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केला आहे.
हवामानाचा गाढा अभ्यास
प्रकाशभाई पारेख यांचे ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील हवामान खात्यातील वैज्ञानिकांची घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्याकडून त्यांना वेळोवेळी पावसाची माहिती मिळत असते त्यांना मिळालेल्या माहितीचा ते सखोल अभ्यास करून दरवर्षी आपल्या पावसाचा अंदाज व्यक्त करीत असतात आणि त्यांचा अंदाज आज पर्यंत वर्तविलेल्या अंदाजानुसार 80 ते 90% खरा ठरला असल्याचे प्रकाशभाई पारेख यांनी सांगितले.