विधी गुजरची शंभर टक्क्यांची ऐतिहासिक भरारी

पुनर्मूल्यांकनाने पालटले चित्र

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर,
vidhi-gujar-srushti-revatkar : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुनर्मूल्यांकनानंतर शंभर टक्के गुण मिळवत आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी विधी गुजर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे ती शहरातील अव्वल विद्यार्थिनींपैकी एक ठरली आहे.
 
 

ngp 
 
 
- निकालावरील विश्वास ठरला यशाचा पाया
 
 
प्रारंभी जाहीर झालेल्या निकालाबाबत समाधान न झाल्याने विधीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. पुनर्तपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली आणि अखेर तिने एकूण १०० टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे चार विषयांमध्ये तिने १०० पैकी १०० गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.
 
- शाळेची दुहेरी अभिमानाची कामगिरी
 
 
यंदाच्या परीक्षेत आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने शहराला दोन अव्वल विद्यार्थिनी दिल्या आहेत. विधी गुजरसोबत सृष्टी रेवतकर हिनेही शंभर टक्के गुण मिळवत उत्कृष्ट यशाची नोंद केली आहे. त्यामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.
 
शाळेने सलग तिसऱ्या वर्षी दहावीच्या परीक्षेत शहरस्तरीय अव्वल विद्यार्थी घडविण्याची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीनही शैक्षणिक वर्षांत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.
 
धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका लखबीर कौर सूरी, पर्यवेक्षिका आणि शिक्षकवृंद यांनी विधीच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनीचे परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.