कुरखेडा येथे भाजपच्या बैठकीत संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
कुरखेडा,
BJP meeting Kurkheda भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या वतीने तालुका संघटनात्मक बैठक तसेच पक्षाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. या बैठकीत ‘एसआयआर’ अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 

BJP meeting Kurkheda 
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
त्यानंतर झालेल्या बैठकीत BJP meeting Kurkheda  पक्षाच्या आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘एसआयआर’ अभियानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक अतुल झोडे, तालुका महामंत्री विनोद नागपूरकर, मंगेश मांडवे, कृष्णा चंद्रमा, लक्ष्मण धुडसे, बाबुराव बनसोड, राकेश खूणे, भाग्यवान जनबंधू, सुखदेव कापगते, प्रकाश ठाकूर, नंदकिशोर मेश्राम. रूपाली कावळे, कविता खडसे, चित्रा बनसोड, विवेक बुद्धी, रेमाजी किरणापुरे यांच्यासह तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बीएलए-2, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.