सेलू,
Bordharan solar बोरधरण विकास आराखडा अंतर्गत लावण्यात आलेले सोलर स्ट्रीट लाईट्स चार ते पाच महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. लाखो रुपये खर्च करूनही हे दिवे अद्याप कार्यान्वित न झाल्याने आश्चर्य व्यत केले जात आहे.राज्य सरकारच्या वतीने बोर धरण परिसराचा विकास करण्यासाठी विशेष आराखडा राबविण्यात आला. यामध्ये पर्यटकांना रात्रीच्या वेळी त्रास होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर सोलर लाईट्स बसवण्यात आले. मात्र, काम पूर्ण होऊन पाच महिने उलटूनही हे दिवे आजतागायत प्रकाश देऊ शकले नाहीत.
बोरधरण परिसर हा वन्यजीव विभागात येत असल्याने येथे नेहमीच वाघांसह अन्य हिंस्त्र श्वापदांचा संचार असतो. अशा संवेदनशील ठिकाणी रात्री रस्ते अंधारात असणे अत्यंत धोकादायक आहे. एकीकडे पर्यटनाला चालना देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे पर्यटकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.
चार महिने उलटूनही हे Bordharan solar सोलर लाईट्स का सुरू करण्यात आले नाहीत? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन हे सोलर लाईट्स त्वरित सुरू करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.