यवतमाळ,
mandar-patki : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची पदोन्नती झाली. त्यांची जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळवून गोंदिया येथे बदली झाली. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी 23 जून रोजी आदेश काढले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार अमरावती विभागीय आयुक्तांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकाèयांकडे सोपवून नवीन पदाचा प्रभार आयएएस डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असेही या बदली आदेशात म्हटले आहे.