गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा : प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
बुलढाणा
buldhana-zilla-parishad आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी सुरुवाती पासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण, मूल्यधीष्टीत व विद्यार्थी केंद्रीत शिक्षण देण्यासाठी शाळा , वर्ग आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीचा अवलंब करून कटिबद्धतेने कार्य करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.
teachers programm 
 
buldhana-zilla-parishad बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व शिक्षकांसाठी स्थानिक सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय शिक्षक उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, गट शिक्षणाधिकारी चेतन वाडीले, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, दत्ता क्षिरसागर व तालुयातील सर्व केंद्राप्रमुख मंचावर उपस्थित होते.
 
buldhana-zilla-parishad पुढे बोलतांना शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले की, यांनी शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर न थांबता गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, नवोपक्रम आणि मूल्यशिक्षण यांवर विशेष भर दिला पाहिजे.
 
buldhana-zilla-parishad याप्रसंगी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षक व शिक्षिकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच शिक्षकांच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात व कार्यालयीन प्रलंबित प्रश्न प्रशासकीय स्तरावर निकाली काढण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी ग्वाही दिली. तथापि शिक्षकांनी मात्र आपला संपूर्ण वेळ हा शालेय गुणवत्ता वाढीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
buldhana-zilla-parishad मिशन झेप- (झेडपीज एजुकेशनल पायोनिअर) अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडे असलेला ओढा थांबवून गावातील शंभर टक्के विद्यार्थी गावातील जिल्हा परिषद शाळेतच प्रवेशित होतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या पहिल्या दिवशीचा प्रवेशोत्सव त्यासोबतच पुस्तक व गणवेश वाटप, विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत व निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाला गती देणे आदी विषयांवर उपस्थितानी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांनी केले तसेच सुत्रसंचलन केंद्रप्रमुख रमेश यंगड यांनी तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सोनूने यांनी केले.