वर्धा,
Deoli Pulgaon development projects देवळी व पुलगाव या दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी आ. राजेश बकाने यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
देवळी आणि पुलगाव या दोन्ही शहरांचा वेगाने विस्तार होत आहे. वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शहरांमध्ये रस्ते, नाली बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, सुशोभीकरण तसेच विविध मूलभूत नागरी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे आ. बकाने यांनी निदर्शनास आणून देत Deoli Pulgaon development projects आ. बकाने यांनी देवळी आणि पुलगाव नगर परिषदांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध विकास प्रकल्पांना विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. भविष्यातील विकास आराखड्याला गती देण्यासाठी नगरविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता व आर्थिक सहाय्य देण्याची विनंतीही केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कारवाई करण्याबाबत अधिकार्यांना निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.