सरसंघचालकांसोबत डॉ. नितीन धांडे यांची भेट

विशेष संवाद कार्यक्रमात आला योग

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
nitin-dhande : इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनाईट नेशन्सतर्फे मुंबईत भारतीय संस्कृती, शिक्षण आणि राष्ट्रउभारणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करणारा एक विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते. त्यांच्याशी भाजपाचे शहराध्यक्ष व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची भेट झाली. दोघांचा संवादही झाला.
 
 
 
AMT
 
 
 
’संस्कृती, शिक्षण आणि भारत’ असे शीर्षक असलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर डॉ. नितीन धांडे म्हणाले की, सरसंघचालकांच्या विचारांनी समाज आणि राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याच्या जाणिवेला एक नवी दिशा दिली आहे. शिक्षण, मूल्ये आणि राष्ट्रीय हितावरील त्यांचे विचार युवकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. असे वैचारीक कार्यक्रम समाजातील विविध घटकांना जोडतात आणि त्यांना राष्ट्राच्या प्रगतीत सक्रियपणे योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित शिक्षण प्रणाली ही एक मजबूत आणि विकसित भारत घडवण्याचा पाया बनेल, असा विश्वास डॉ. धांडे यांनी व्यक्त केला.